

India Women Cricket Team
Sakal
Pratika Rawal joins India's ODI Squad against Australia: भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील टी२० मालिका सध्या सुरू असून यानंतर तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. वनडे मालिकेसाठी भारताच्या संघात एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे.
निवड समितीने भारताच्या वनडे संघात (India Women Team) २५ वर्षीय प्रतिका रावल (Pratika Rawal) हिचा समावेश केला आहे. याआधी तिचा संघात समावेश नव्हता, पण मंगळवारी तिला संघात सामील करण्यात आले आहे.