

India Women T20I Team
Sakal
Asian Games 2026 Cricket: आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ स्पर्धेत क्रिकेट देखील खेळवले जाणार आहे. यात भारताचे महिला आणि पुरुष असे दोन्ही संघ सहभागी होत आहेत. महिला संघाचे सामने १७ ते २२ सप्टेंबरदरम्यान खेळवले आहेत. त्यानंतर पुरुष संघाचे सामने होतील.
पण त्याआधी भारतीय महिला संघाला (India Women's Cricket Team) धक्का बसला आहे. भारताची स्टार फलंदाज जेमिमाह रोड्रिग्स (Jemimah Rodrigues) या स्पर्धेतून बाहेर झाली आहे. त्यामुळे तिच्या बदली खेळाडू कोण असेल, हे समोर आले आहे.