

India Women Test Team
Sakal
IND vs ENG Lord's Women's Test: १४२ वर्षांच्या क्रिकेट इतिहासात जे कधीही घडलं नाही, ते शुक्रवारी घडणार आहे. क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानात महिला कसोटी सामना भारत आणि इंग्लंड संघात खेळली जाणार आहे. यापूर्वी कधीही लॉर्ड्सवर महिलांचा कसोटी सामना झाला नव्हता.
पुरुषांची मक्तेदारी राहिलेल्या लॉर्ड्सवर आता भारत आणि इंग्लंड महिला संघ इतिहास घडवण्यास सज्ज आहेत. लॉर्ड्सवर काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलिया महिला संघाने ७ व्यांदा टी२० वर्ल्ड कप उंचावला. आता याच मैदानात इंग्लंड आणि भारतीय महिला संघ कसोटी सामना खेळण्यास सज्ज आहे. मात्र या सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.