

Preity Zinta playful Punch to Priyansh Arya | IPL 2026
Sakal
IPL 2026, DC vs PBKS Marathi News: शनिवारचा (२५ एप्रिल) दिवस पंजाब किंग्सने क्रिकेट चाहत्यांसाठी अविस्मरणीय ठरवला. आयपीएल २०२६ स्पर्धेत शनिवारी पंजाब किंग्सने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध अविश्वसनीय विजय मिळवला.
पंजाबच्या या विजयात सलामीवीर प्रभसिमरन सिंग आणि प्रियांश आर्य (Prabhsimran Singh & Priyansh Arya) यांच्यासह कर्णधार श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) मोलाचा वाटा उचलला. सामन्यानंतर प्रियांश आर्यसोबत पंजाब किंग्सची संघमालकीण प्रीत झिंटाची (Preity Zinta) मस्ती करतानाही दिसली.