

Preity Zinta | Arshdeep Singh - Shreyas Iyer | IPL 2026
Sakal
IPL 2026 Punjab Kings Marathi News : इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत (IPL 2026) श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्सने (Punjab Kings) पहिल्या टप्प्यात दमदार कामगिरी केली. पहिल्या ७ सामन्यात पंजाब किंग्सने ६ सामने जिंकले, तर एक सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे पहिल्या टप्प्यात पंजाब किंग्स अपराजित होते. मात्र त्यानंतर पंजाबची कामगिरी घसरली. त्यांना सलग ४ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.
सोमवारी (११ मे) दिल्ली कॅपिटल्सने पंजाबविरुद्ध २११ धावांच्या लक्ष्याचाही यशस्वी पाठलाग केला, हा पंजाबचा सलग चौथा पराभव होता. याचदरम्यान, पंजाब संघातील काही खेळाडूंबाबत वादग्रस्त गोष्टींची चर्चा आहे, यावर पंजाब किंग्सची सहसंघमालकीण प्रीती झिंटानेही (Preity Zinta) प्रतिक्रिया दिली आहे.