

Pat Cummins | SRH | IPL 2026
Sakal
Gujarat Titans vs Sunrisers Hyderabad Marathi News: पॅट कमिन्सच्या नेतृत्वातील सनरायझर्स हैदराबाद संघाला मंगळवारी (१२ मे) गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला.
अहमदाबाद येथे झालेल्या सामन्यात गुजरातने हैदराबादविरुद्ध ८२ धावांनी विजय मिळवत प्लेऑफमधील स्थानही जवळपास पक्के केले.
खरंतर हा सामना जिंकणाऱ्या संघाला पाँइंट्स टेबलमध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासोबतच प्लेऑफच्या दिशेने महत्त्वाचं पाऊल टाकण्याची संधी होती. ही संधी गुजरातने साधली. मात्र, हैदराबादच्या (SRH) या पराभवानंतर त्यांचा कर्णधार पॅट कमिन्सलाही (Pat Cummins) मोठा दंड झाला आहे.