पृथ्वी शॉने महाराष्ट्राकडून पहिल्याच सामन्यात दमदार शतक झळकावले.
ऋतुराज गायकवाड सरळ चेंडूवर त्रिफळाचीत होऊन १ धावांवर बाद झाला.
महाराष्ट्राची ७१/० वरून अवस्था ८६/४ अशी झाली होती, पृथ्वीने एकाकी खिंड लढवत शतक पूर्ण केले.
Maharashtra vs Chhattisgarh Buchi Babu match live score: मुंबईकडून महाराष्ट्र संघाकडून खेळण्याचा निर्णय घेणाऱ्या पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) याने पहिल्याच सामन्यात धमक दाखवली. बुची बाबू ट्रॉफी स्पर्धेतील महाराष्ट्र विरुद्ध छत्तीसगड या लढतीत पृथ्वीने खणखणीत शतक झळकावले. ऋतुराज गायकवाड सरळ चेंडूवर त्रिफळाचीत झाल्याने महाराष्ट्राची डोकेदुखी वाढली होती. पण, पृथ्वीने एकाकी खिंड लढवली आहे.