
दिंडोशी सत्र न्यायालयाने ९ सप्टेंबर रोजी पृथ्वी शॉवर १०० रुपयांचा प्रतीकात्मक दंड ठोठावला.
शॉच्या वकिलाला १३ जून रोजी "शेवटची संधी" देण्यात आली होती, तरीही उत्तर दाखल झाले नाही.
सपना गिल हिने अंधेरीतील पबमध्ये शॉने छेडछाड व हल्ला केल्याचा आरोप केला आहे.
Prithvi Shaw Faces Court Action, Rs 100 Fine Over Molestation Case : भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ हा पुन्हा एकदा चुकीच्या कारणामुळे चर्चेत आला आहे. नुकताच त्याने मुंबई संघ सोडून महाराष्ट्राकडून खेळण्याचा निर्णय घेतला आणि बुची बाबू स्पर्धेत दमदार कामगिरीही केली. आता पृथ्वीची गाडी रुळावर येईल असे वाटत असताना, नवा वाद समोर आला आहे. छेडछाड प्रकरणातील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सपना गिलच्या याचिकेवर उत्तर देण्याची पृथ्वी शॉला वारंवार संधी दिली होती. पण, त्याने आपले उत्तर दाखल केले नाही आणि त्यामुळे सत्र न्यायालयाने त्याला १०० रुपयांचा दंड भरण्यास सांगितले.