
भारताचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ हा गेल्या अनेक महिन्यांपासून क्रिकेटमध्ये फारसा दिसलेला नाही. तो अनेक वर्षांपासून आता भारताच्या संघातून दूर आहेच, पण त्याला गेल्या काही महिन्यात मुंबई संघातही स्थान मिळत नाहीये. त्याला आयपीएल २०२५ साठीही कोणत्याही संघाने खरेदी केले नव्हते.
अशात आता त्याने मोठा निर्णय घेतला असून सर्वांनाच त्याचे आश्चर्य वाटले आहे. त्याने मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) कडे दुसऱ्या राज्याकडून देशांतर्गत क्रिकेट खेळण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र (NOC) मागितले होते. तसे पत्र त्याने मुंबई क्रिकेट असोसिएशनला लिहिले होते.