
भारताचा सलमीवीर पृथ्वी शॉ याने काही दिवसांपूर्वीच मुंबई क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्याला मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून त्यासाठी ना हरकत प्रमाणपत्रही देण्यात आलं होतं. मात्र पृथ्वी शॉ याने तो आता आगामी देशांतर्गत क्रिकेट हंगामात कोणत्या संघाकडून खेळणार हे स्पष्ट केले नव्हते.
मात्र आता तो आगामी हंगामात कोणत्या संघाकडून खेळणार हे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांनी केलेल्या पोस्टनंतर स्पष्ट झाले आहे.