
२५ वर्षीय पृथ्वी शॉ याने काही दिवसांपूर्वीच आगामी देशांतर्गत हंगामात मुंबई संघ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही महिन्यांपासून क्रिकेटमध्ये दमदार पुनरागमनासाठी तो संघर्ष करताना दिसला आहे.
गेल्या देशांतर्गत हंगामात त्याला बऱ्याचदा मुंबई संघातून त्याच्या फिटनेसच्या कारणाने वगळण्यात आलं होतं. त्याशिवाय त्याला आयपीएल २०२५ साठीही कोणत्याही संघाने त्याला खरेदी केले नव्हते. एकूणच त्याच्या वागणूकीवर आणि त्याच्या फिटनेसवर बरीच टीकाही झाली. तो काही वर्षांपूर्वी हॉटेलबाहेर हाणामारी प्रकरणातही अडकला होता.
या सर्व गोष्टींबद्दल त्याने नुकतेच मोकळेपणाने प्रतिक्रिया दिली आहे. पृथ्वी शॉने मान्य केले त्याची संगत चुकली. त्याच्याकडून अनेक चुकाही झाल्या आणि काही चूकीचे निर्णय घेण्यात आले.