Prithvi Shaw loses his cool after scoring 181, clashes with Musheer Khan during domestic match.
esakal
Cricket
Prithvi Shaw : पृथ्वी शॉ पुन्हा वादात अडकला; १८१ धावांच्या खेळीनंतर सर्फराज खानच्या भावाला बॅटने मारायला धावला... VIDEO VIRAL
Prithvi Shaw on-field clash video details : भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. १८१ धावांची झंझावाती खेळी करूनही त्याचं नाव चर्चेत आलं ते खेळामुळे नव्हे, तर मैदानावरील वादामुळे.
What happened between Prithvi Shaw and Musheer Khan? मुंबईचा संघ सोडून महाराष्ट्राकडून खेळणाऱ्या पृथ्वी शॉ याने मंगळवारी १८१ धावांची वादळी खेळी केली. पण, त्याच्या या खेळीपेक्षा नंतर घडलेल्या वादामुळे तो चर्चेत आला. माजी संघ मुंबईविरुद्धच्या या सामन्यात बाद झाल्यानंतर पृथ्वीने माजी सहकाऱ्यासोबत वाद घातला आणि प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार त्याने मारायला बॅट उचलल्याचे सांगण्यात येत आहे.
