Prithvi Shaw: मला घराबाहेर पडावसं वाटत नाही, आता फक्त...! पृथ्वी शॉने घेतला मोठा निर्णय; असं नेमकं काय घडलं?

Prithvi Shaw latest interview about his cricket struggles: पृथ्वी शॉ गेल्या काही वर्षांपासून आपल्या कारकिर्दीतील कठीण टप्प्याचा सामना करत आहे. मैदानावरील कामगिरी, संघातील स्थान आणि सातत्यपूर्ण संधी मिळवण्याच्या आव्हानांदरम्यान त्याने आता स्वतःच्या खेळावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे.
Prithvi Shaw

Prithvi Shaw latest interview about his cricket struggles

esakal

Updated on: 

Prithvi Shaw opens up about his India comeback dream : कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमी चर्चेत असणारा पृथ्वी शॉ याने एक मोठा निर्णय घेतला आहे. कधी भांडण, कधी मैदानावरील गैरशिस्त, कधी वैयक्तिक आयुष्यातील प्रसंग... या नकोशा कारणाने पृथ्वी चर्चेत राहिला आहे. त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही प्रचंड उलथापालथ पाहायला मिळाली. पण, या सर्व घटनांमधून धडा घेत पृथ्वीने आता सर्व लक्ष खेळावर केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला आहे. 'मी, माझं क्रिकेट आणि माझं कुटुंब', या भूमिकेत तो आला आहे. रणजी करंडक स्पर्धेत ऋतुराज गायकवाडच्या गैरहजेरीत पृथ्वीकडे महाराष्ट्र संघाचे नेतृत्व सोपवले गेले आणि त्याच्या नेतृत्वाखाली संघाने विजयही मिळवला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com