
prithvi shaw cricket career astrology : युवा फलंदाज पृथ्वी शॉ या ना त्या कारणाने सतत चर्चेत असतो. त्याच्या गैरवर्तवणुकीचे किस्से वाढत चालले आहे, त्यामुळेच मुंबई संघानेही त्याला बाहेरचा रस्ता दाखवला होता. २५ वर्षीय पृथ्वीच्या भविष्याबाबत मोठा दावा केला गेला आहे. ज्योतिषी ग्रीनस्टोन लोबो यांनी आपल्या कारकीर्दित सातत्य राखण्यासाठी धडपडणारा पृथ्वी शॉसाठी पुढे आव्हानात्मक कालावधीचा अंदाज वर्तवला आहे .