पृथ्वी शॉने मुंबई सोडून महाराष्ट्र संघाकडून पहिल्याच सामन्यात शतक झळकावले.
छत्तीसगडविरुद्धच्या बुची बाबू स्पर्धेत त्याने १४ चौकार व १ षटकारासह शतक ठोकले.
मुंबईतून गैरवर्तवणूक, तंदुरुस्ती व फॉर्म यामुळे त्याला संघाबाहेर करण्यात आले.
Prithvi Shaw Responds to Naysayers After Leaving Mumbai: मुंबईचा फलंदाज पृथ्वी शॉ याने देशांतर्गत स्पर्धांमध्ये महाराष्ट्र संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्याच सामन्यात शतक झळकावले. बुची बाबू क्रिकेट स्पर्धेत छत्तीगडविरुद्धच्या लढतीत पृथ्वी शॉ याने शतक झळकावले. पृथ्वीला मुंबईच्या संघातून गैरवर्तवणुकीमुळे, तंदुरुस्तीच्या कारणामुळे आणि फॉर्मामुळे वगळण्यात आले. त्यामुळे त्याने महाराष्ट्राच्या संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतला.