Pro Kabbadi 2024 : फक्त 40 मिनिटे सर्वोत्तम खेळायचेय... पुण्याला खुणावतेय पहिले विजेतेपद

puneri paltan
puneri paltanesakal

Pro Kabbadi 2024 Puneri Paltan Captain Aslam Inamdar :

हैदराबाद, ता. २९ : साखळी स्पर्धेत सर्वाधिक विजय, उपांत्य सामन्यातही शानदार कामगिरी अशी झेप घेणारा पुणेरी पलटणचा संघ प्रो कबड्डीच्या पहिल्या वहिल्या विजेतेपदासाठी सज्ज झालाय. अजूनपर्यंत सर्व काही व्यवस्थित घडले आता अवघी ४० मिनिटे आम्हाला झोकून देऊन खेळायचे आहे. विजेतेपद फार दूर नाही, असा विश्वास पुण्याचा कर्णधार अस्लम इनामदारने व्यक्त केला.

गत स्पर्धेतही पुण्याने अंतिम फेरी गाठली होती; परंतु जखमी झाल्यामुळे अस्लम अंतिम सामना खेळू शकला नव्हता आणि पुण्याचे स्वप्न जयपूरविरुद्ध निसटत्या पराभवामुळे पूर्ण झाले नव्हते. यंदा अस्लम आणि त्याची पुणेरी सेना पूर्ण जोशात आहे आणि फॉर्मातही आहे, त्यामुळे विजेतेपदासाठी ते प्रबळ दावेदार समजले जात आहेत.

puneri paltan
Sourav Ganguly Rohit Sharma : रोहित शर्माला कर्णधार केलं कारण... सौरव गांगुली भारतीय कर्णधाराबद्दल काय बोलला?

चढाया आणि पकडींच्या खेळात पुण्याचा संघ समतोल आहे. स्वतः अस्लम, पंकज मोहिते आणि मोहित गोयत चढायांची बाजू सांभाळत आहेत तर पकडींमध्ये इराणचा मोहम्मद्रेझा, अभिनेष नटराजन बचावात अभेद्य कामगिरी करत आहेत.

मी बाद झालो तरी जास्त वेळ कोर्ट बाहेर राहात नाही, कारण कोर्टवरील इतर सहकारी गुण मिळवून मला जीवदान देतात, असे अस्लमने सांगितले. उद्याही अस्लम कोर्टवर जेवढा जास्त राहिले तेवढे पुण्याची विजेतेपदाची शक्यता अधिक वाढणार आहे.

पुणेकरांना आवाहन

प्रो कबड्डीत पुण्याचा संघ आता बलाढ्य संघ म्हणून ओळखला जातो. त्याचे श्रेय खेळाडूंसह संघ व्यवस्थापनालाही आहे. आत्तापर्यंत तुम्ही आम्हाला जसा पाठिंबा दिला, तसेच अंतिम सामन्यासाठीही आम्हाला शुभेच्छा द्या, असे पुणेकरांना अस्लमने अंतिम सामन्याची तयारी करताना सांगितले.

या मोसमात पुणे आणि हरियाना यांच्यात झालेल्या दोन साखळी सामन्यांत १-१ अशी बरोबरी राहिलेली आहे. जो सामना आम्ही त्यांच्याविरुद्ध गमावला होता, त्यातील चुका सुधारण्याचा अभ्यास आम्ही केलेला आहे आणि अर्थातच आत्मविश्वास प्रबळ असल्यामुळे आम्ही प्रत्येक संधीचा फायदा घेऊ, असे अस्लम म्हणाला.

puneri paltan
Mohammed Shami Injury Update : लंडनमधील उपचारानंतर.... बीसीसीआयने मोहम्मद शमीच्या दुखापतीवर दिली मोठी अपडेट

जयदीप दहिया याच्या नेतृत्वाखाली खेळणारा हरियानाचाही संघ तेवढाच आत्मविश्वास बाळगून आहे. उपांत्य सामन्यात आम्ही गतविजेत्या जयपूरला हरवले आहे त्यामुळे सर्व खेळाडूंचे मनोबल उंचावलेले आहे, असे जयदीपने सांगितले.

हरियाना संघात भारतीय कबड्डीतील कोणताही नावाजलेला चेहरा नाही; परंतु सर्व नवोदित खेळाडू कमाल कामगिरी करत आहे. अष्टपैलू खेळ ही आमची जमेची बाजू असल्याचे जयदीप म्हणतो. हरियाना संघाची मदार चढायांमध्ये शिवम पाठारे, विनय यांच्यावर असणार आहे तर बचावात जयदीप, मोहित नंदाल अस्लमच्या चढायांना कसे रोखतात, यावर सामन्याचा कल अवलंबून असणार आहे.

(Sports Latest News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com