Pakistan Super League 10 is in financial turmoil
इंडियन प्रीमिअर लीगसोबत स्पर्धा करायला उतरलेली पाकिस्तान सुपर लीग आर्थिक डबघाईला आली आहे. PSL चे दहावे पर्व सध्या खेळवले जात आहे आणि त्यांच्यात सहभाग घेणाऱ्या फ्रँचायझींना काहीच आर्थिक फायदा झालेला नाही. त्या स्टेडियममध्ये हाताच्या बोटावर मोजण्याइतके प्रेक्षक दिसत असल्याने स्पॉन्सरही एकामागून एक माघार घेत असल्याचे चित्र दिसतेय. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची ( PCB) डोकेदुखी वाढतेय.