
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धा (IPL) आणि पाकिस्तान सुपर लीग २०२५ (PSL) स्पर्धा नुकतीच संपली आहे. यंदा दोन्ही स्पर्धा एकाच वेळी म्हणजे एप्रिल - मे महिन्यात खेळवण्यात आल्याने बरीच चर्चा झाली होती.
अनेक खेळाडूंनी पीएसएलच्या ऐवजी आयपीएलमध्ये खेळणे पसंत केले होते. पण असं असतानाही पुन्हा एकदा पाकिस्तान क्रिकेट बोर्ड भारताशी पंगा घेण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. पुढच्यावर्षी म्हणजे २०२६ मध्येही आयपीएल आणि पीएसएल एकाचवेळी होण्याची दाट शक्यता आहे.