

Goa’s Celebration for Shubman Gill Wicket
Sakal
विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६ स्पर्धेतील (Vijay Hazare Trophy) सहावी फेरी मंगळवारी (६ जानेवारी) पार पडली. या फेरीत भारताचा वनडे आणि कसोटी कर्णधार शुभमन गिलही मैदानात उतरला होता. या फेरीत पंजाबचा सामना गोव्याविरुद्ध होता.
या सामन्यात पंजाबने ६ विकेट्सने सहज विजय मिळवला. मात्र, या सामन्यात शुभमन गिल (Shubman Gill) फार काही कमाल दाखवू शकलेला नाही. टी२० वर्ल्ड कपसाठी संघातून वगळल्या गेल्यानंतर गिल पहिल्यांदाच मैदानात दिसला होता. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडे सर्वांचेच लक्ष होते. मात्र त्याने चाहत्यांना निराश केले.