

Sanju Samson - Vishnu Vinod
Sakal
Vishnu Vinod joins Ruturaj Gaikwad in Elite List: विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६ स्पर्धेत अनेक रोमांचक सामने पाहायला मिळाले आहेत, तसेच बऱ्याच खेळाडूंनी लक्ष वेधले. आता मंगळवारी (६ जानेवारी)३२ वर्षांच्या विष्णू विनोदने सर्वांचे लक्ष वेधले आहेत.
त्याने षटकारांची बरसात करत नाबाद दीडशतकासह केरळ संघाला पाँडिचेरीविरुद्ध ८ विकेट्सने मोठा विजय मिळवून दिला आहे. यासह त्याने ऋतुराज गायकवाडच्या (Ruturaj Gaikwad) पंक्तीत स्थान मिळवले आहे.
मंगळवारी पाँडिचेरीने केरला २४८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. हे लक्ष्य केरळने २९ षटकातच २ विकेट्स गमावत २५२ धावा करून पार केले. केरळला हा विजय मिळवून देण्यात विष्णू विनोदला (Vishnu Vidod) बाबा अपराजीतनेही साथ दिली.