Punjab Kings Likely Playing XI: हार्दिक पांड्या, मार्को यान्सेन अन्... ; पंजाब किंग्सकडे ऑल राऊंडर्सची तगडी फौज, श्रेयस अय्यरचे ११ महारथी, जे पडतील सर्वांवर भारी

Punjab Kings predicted playing XI for IPL 2027: आयपीएल २०२७ साठी पंजाब किंग्सचा संघ यंदा अधिक ताकदवान दिसत आहे. हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंग यांच्या ट्रेडमुळे पंजाबच्या संघरचनेत मोठा बदल झाला आहे. हार्दिकच्या रूपाने पंजाबला अनुभवी भारतीय अष्टपैलू खेळाडू मिळाला आहे.
Punjab Kings predicted playing XI for IPL 2027

Punjab Kings predicted playing XI for IPL 2027

Updated on: 

Hardik Pandya joins Punjab Kings for IPL 2027 : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये हार्दिक पांड्याचा मुंबई इंडियन्ससोबतचा प्रवास पुन्हा एकदा संपुष्टात आला. २०२२ मध्ये गुजरात टायटन्सचे नेतृत्व करताना हार्दिकने GT ला पहिल्याच हंगामात जेतेपद पटकावून दिले आणि त्यानंतर तो संघाला अंतिम फेरीपर्यंत घेऊन गेला. हार्दिकचे नेतृत्व कौशल्य पाहून प्रभावित झालेल्या MI ने त्याला पुन्हा आपल्या ताफ्यात घेतले, पंरतु चाहत्यांचा रोष अन् अंतर्गत वादामुळे तो अपेक्षित निकाल नाही देऊ शकला. आता हार्दिकने पुन्हा MI ची साथ सोडली आणि तो IPL 2027 मध्ये पंजाब किंग्सकडून खेळणार आहे. पंजाबने हार्दिकला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी अतिरिक्त १.६५ कोटी मोजले. त्यांची ही रणनीती आगामी हंगामात भल्याभल्यांसाठी घातक ठरणार आहे.

Loading content, please wait...