धक्कादायक! आचाऱ्याला मारहाण अन् शिविगाळ; प्रीती झिंटाच्या 'आवडत्या' खेळाडूविरोधात FIR, नेमकं काय घडलं?

Shashank Singh accused of assault by family cook : आयपीएलमध्ये पंजाब किंग्जकडून खेळणारा शशांक सिंग गंभीर कायदेशीर वादात अडकला आहे. भोपाळमधील रतीबड पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात आणि त्याचे वडील शैलेश सिंग यांच्याविरोधात मारहाण व शिवीगाळ केल्याचा आरोप करत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
Punjab Kings batter Shashank Singh has landed in legal trouble after an FIR was registered

Punjab Kings batter Shashank Singh has landed in legal trouble after an FIR was registered

esakal

Updated on

Punjab Kings batter Shashank Singh FIR in Bhopal: इंडियन प्रीमिअर लीगमधील संघ पंजाब किंग्सचा फलंदाज शशांक सिंग आणि त्याचे वडील, निवृत्त विशेष पोलीस महासंचालक (डीजीपी) शैलेश सिंग यांच्यावर मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, आचारी विपेंद्र सिंग तोमर याने २९ जून रोजी भोपाळमधील रतिबाद पोलीस ठाण्यात शशांक व शैलेश सिंग यांच्याविरोधात FIR दाखल केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com