IPL 2026 Marathi News: बाळासोबत वेळ घालवायचाय... ७ सामने नाही खेळू शकणार स्टार गोलंदाज... नियमानुसार होणार बंदीची कारवाई?

Will Lockie Ferguson face ban IPL 2026? आयपीएल २०२६ सुरू होण्यापूर्वीच पंजाब किंग्स संघाला मोठा धक्का बसला आहे. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ल्युकी फर्ग्युसन स्पर्धेच्या सुरुवातीच्या सात सामन्यांना मुकणार असल्याची माहिती समोर आली आहे. फर्ग्युसनने वैयक्तिक कारणास्तव, विशेषतः आपल्या पत्नी आणि नुकत्याच जन्मलेल्या मुलासोबत वेळ घालवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
Lockie Ferguson to miss early IPL 2026 matches for personal reasons,

Lockie Ferguson to miss early IPL 2026 matches for personal reasons,

esakal

Updated on

Lockie Ferguson IPL 2026 availability Punjab Kings: न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ल्युकी फर्ग्युसन हा इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या पहिल्या काही सामन्यांना वैयक्तिक कारणास्थव मुकणार आहे. ३४ वर्षीय गोलंदाजाला आयपीएल २०२५ च्या लिलावात पंजाब किंग्सने २ कोटी रुपयांत करारबद्ध केले आहे. पण, तो पहिल्या सात सामन्यांना खेळण्याची शक्यता कमी आहे. त्याला त्याच्या नुकत्याच जन्मलेल्या मुलासोबत वेळ घालवायचा आहे. "तो पहिल्या सात सामन्यांसाठी उपलब्ध नाही," असे सूत्रांनी सांगितले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com