SALIL ARORA SMASHED HUNDRED FROM JUST 39 BALLS
esakal
Punjab vs Jharkhand SMAT match highlights : अभिषेक शर्मा, शुभमन गिल हे पंजाबचे युवा फलंदाज आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवत आहेत. अनेक पंजाबी खेळाडू आयपीएल व देशांतर्गत स्पर्धेतही आपली छाप पाडत आहेत. अशात आणखी एक नाव समोर आले आहे आणि त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत झारखंडविरुद्ध ३९ चेंडूंत शतक ठोकले आहेत. ट्वेंटी-२०तील वेगवान शतकवीरांच्या यादीत त्याने इंग्लंडच्या फिल सॉल्टशी बरोबरी केली, तर संजू सॅमसनला (४०) मागे सोडले.