Ranji Trophy Final: बॅग भर अन् निघ... रात्री ९:३० चा फोन कॉल अन् पठ्ठ्यानं एका रात्रीत फायनल गाठून ठोकलं दीडशतक

Qamran Iqbal Journey for Ranji Trophy Final: जम्मू-काश्मीरने रणजी ट्रॉफी २०२५-२६ जिंकून इतिहास रचला. अंतिम सामन्यात कामरान इक्बालने नाबाद १६० धावा करत संघाला विजय मिळवून दिला. पण अंतिम सामन्याच्या आधी तो श्रीनगरला होता.
Qamran Iqbal | Ranji Trophy Final

Qamran Iqbal | Ranji Trophy Final

Sakal

Updated on

Qamran Iqbal Journey for Ranji Trophy 2025-26 Final: जम्मू-काश्मीरने रणजी ट्रॉफी २०२५-२६ हंगामाचे विजेतेपद जिंकून इतिहास घडवला. पारस डोगराच्या नेतृत्वाखाली जम्मू-काश्मीर रणजी ट्रॉफी जिंकणारा २१ वा संघ ठरला. त्यांच्या विजयात अनेक खेळाडूंचे योगदान राहिले. अकिब नबी त्यातील एक, ज्याने या हंगामात ६० विकेट्स घेतल्या.

कर्नाटकविरुद्ध हुबळीमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात जम्मू-काश्मीरच्या (Jammu and Kashmir) आणखी एका खेळाडूने सर्वांचे लक्ष वेधले, तो खेळाडू म्हणजे सलमीवीर कामरान इक्बाल (Qamran Iqbal). त्याने अंतिम सामन्यात दुसऱ्या डावात ३११ चेंडू खेळताना १६ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद १६० धावा केल्या.

<div class="paragraphs"><p>Qamran Iqbal | Ranji Trophy Final</p></div>
Ranji Trophy: इतिहास घडला! जम्मू-काश्मीर ठरले नवे चॅम्पियन; केएल राहुल, मयंक अगरवाल, पडीक्कलच्या कर्नाटकला दिली मात
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com