

Ravichandran Ashwin's Special Advice for Vaibhav Sooryavanshi
esakal
Ravichandran Ashwin's Special Advice for Vaibhav Sooryavanshi: आज भारतीय टी-२० संघ आयर्लंडविरुद्ध मैदानात उतरणार आहे. मात्र, या संपूर्ण मालिकेत सर्वांचे लक्ष असेल ते १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीकडे. वैभव सूर्यवंशी(Vaibhav Sooryavanshi) आजच्या सामन्यात पदार्पण करण्याची दाट शक्यता आहे. १५ वर्षांच्या मुलासाठी त्याला मिळणारे लक्ष आणि कौतुक हे भारावून टाकणारे असू शकते.
मात्र, वैभव हा विशेष खेळाडू आहे. त्याने वयाच्या १२ व्या वर्षी रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केले. त्यानंतर वयाच्या १४ व्या वर्षी आयपीएलमध्ये शतक झळकावले. त्याचबरोबर आयपीएल २०२६ च्या हंगामात सर्वाधिक धावा करत ऑरेंज कॅपही पटकावली.