

R Ashwin on Rohit Sharma- Shubman Gill Runout
Sakal
भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात नुकताच शनिवारी (१३ जून) वनडे मालिकेतील पहिला सामना धरमशाला येथे झाला. पावसामुळे २५-२५ षटकांचा झालेल्या या सामन्यात भारताने ७ विकेट्सने विजय मिळवला.
भारताच्या विजयात कर्णधार शुभमन गिलने मोलाचा वाटाही उचलला. पण भारताच्या डावाच्या सुरुवातीला त्याच्यात आणि रोहित शर्मामध्ये झालेल्या गोंधळात रोहित शर्माने विकेट गमावली होती. यावर आता भारताचा दिग्गज फिरकीपटू आर अश्विनने प्रतिक्रिया दिली आहे.