

Shubman Gill on Rohit Sharma's Run Out
Sakal
India vs Afghanistan 1st ODI: भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात सध्या वनडे मालिका सुरू असून पहिला सामना शनिवारी (१३ जून) पार पडला. धरमशाला येथे झालेल्या या सामन्यात भारताने ७ विकेट्सने विजय मिळवला. पण या सामन्यात रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शुभमन गिल (Shubman Gill) फलंदाजी करताना गोंधळ झाला होता. त्यावर शुभमन गिलने भाष्य केले आहे.