

Virat Kohli
Sakal
R Ashwin Praise Virat Kohli and Shreyas Iyer: भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली सध्या अफलातून फॉर्ममध्ये खेळत आहे. भारतासाठी गेल्या ५ वनडे सामन्यात त्याने ५० धावांचा टप्पा ओलांडला असून यात दोन शतकांचा समावेश आहे. तो रविवारी (११ जानेवारी) देखील शतकाच्या उंबरठ्यावर होता.
रविवारी भारत आणि न्यूझीलंड संघात (India vs New Zealand) पहिला वनडे सामना बडोद्याला झाला, ज्यात भारताने ४ विकेट्सने विजय मिळवला. या विजयात विराट कोहलीचे (Virat Kohli) मोलाचे योगदान होते. त्याला सामनावीर पुरस्कारही मिळाला.