

Rohit Sharma - Virat Kohli
Sakal
R Ashwin on Rohit Sharma & Virat Kohli: गेल्या काही काळापासून भारताचे माजी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील भवितव्याबाबत चर्चा सुरू आहेत. भारताच्या या दोन्ही दिग्गज खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय टी२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, पण दोघेही अजूनही वनडे क्रिकेटमध्ये सक्रिय आहेत.
तसेच या दोघांनीही यापूर्वी अनेकदा २०२७ वनडे वर्ल्ड कप (2027 World Cup) खेळण्याची इच्छा असल्याचे स्पष्ट बोलून दाखवले आहे. पण असे असतानाच दोघांच्याही वनडे संघातील स्थानाबाबत सातत्याने चर्चा होत आहे. याबाबत आता आर अश्विनने त्याचे स्पष्ट मत मांडले आहे.