ENG vs IND, ODI: रोहित शर्माचं शतक, विराट कोहलीने ठोकली आरोळी अन् रितिकाला कोसळले आनंदाश्रु; Video Viral

Rohit Sharma Century Video: रोहित शर्माने लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्ध वनडेत शतक केले. त्यावेळी विराटने त्याच्यासोबत त्याचे शतक साजरे केले, तर रोहितच्या पत्नीलाही त्यावेळी अश्रु अनावर झाले होते.
Rohit Sharma Century | India vs England Lord's ODI

Rohit Sharma Century | India vs England Lord's ODI

Sakal

Updated on

England vs India 3rd ODI, News: रविवारी (१९ जुलै) भारतीय संघाला इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्सला झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात २७ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे भारतीय संघाला तीन सामन्यांची वनडे मालिकाही २-१ अशा फरकाने गमवावी लागली. पण हा सामना भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मासाठी (Rohit Sharma) महत्त्वाचा होता.

आंतरराष्ट्रीय टी२० आणि कसोटीतून आधीच निवृत्ती घेतलेल्या रोहित शर्माला इंग्लंडविरुद्ध पहिल्या दोन्ही सामन्यात खास काही करता आले नव्हते. त्यामुळे त्याच्या फॉर्मवर चिंता व्यक्त होत होती, तसेच त्याच्या संघातील जागेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते.

काही रिपोर्ट्लही समोर आले होते की तो या सामन्यानंतर निवृत्तीचा विचार करू शकतो. मात्र या सर्व चर्चा सुरू असतानाच रोहित शर्माने या सामन्यात खणखणीत शतक ठोकत टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले.

Rohit Sharma Century | India vs England Lord's ODI
IND vs ENG, Lord's ODI: इंग्लंडला RO-KO नडले, पण अखेर भारतीय संघाचा प्रयत्न तोकडे पडले! यजमानांनी विजयासह मालिकाही जिंकली
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com