
तामिळनाडू प्रीमियर लीग २०२५ स्पर्धा सध्या सुरू असून या स्पर्धेत आर अश्विन, साई किशोर असे खेळाडूही खेळताना दिसत आहे. या स्पर्धेत कोइंबतूर येथे पाचवा सामना रविवारी तिरुप्पूर तामिझान्स विरुद्ध दिंडिगुल ड्रॅगन्स संघात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात एक नाट्यमय घटना घडली. दिंडिगुल ड्रॅगन्सचा कर्णधार आर अश्विनची विकेट वादग्रस्त ठरली.