
पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सध्या महाराष्ट्र् प्रीमियर लीग २०२५ स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत रोमांचक सामने रोज पाहायला मिळत आहेत. शनिवारी देखील रत्नागिरी जेट्स आणि कोल्हापूर टस्कर्स संघात असाच सामना झाला.
या सामन्यात दोन्ही संघांकडून स्फोटक फलंदाजी पाहायला मिळाली. त्यातही रत्नागिरी जेट्सच्या दिव्यांग हिंगणेकरने त्याच्या आक्रमक फटकेबाजीने मैफल लुटली.