आर अश्विनने भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आता जगभरातील टी२० स्पर्धांमध्ये खेळण्याची तयारी केली आहे. ILT20 आणि BBL या स्पर्धांमध्ये तो सहभागी होऊ शकतो. अश्विन या दोन्ही स्पर्धांमध्ये खेळणारा पहिला भारतीय खेळाडू ठरू शकतो..भारताचा दिग्गज फिरकीपटू आर अश्विनने ऑगस्टमध्ये सर्व प्रकारच्या भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्याने निवृत्तीची घोषणा करतानाच सांगितले होते की तो जगभरातील विविध स्पर्धांमध्ये खेळताना दिसू शकतो. आता त्याबाबतच मोठी माहिती मिळाली आहे. आर अश्विन आता संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि ऑस्ट्रेलियामध्येही खेळताना दिसू शकतो.युएईमध्ये इंटरनॅशनल लीग टी२० (ILT20) आणि ऑस्ट्रेलियामध्ये बिग बॅश लीग (BBL) या टी२० स्पर्धा खेळल्या जातात. या दोन्ही स्पर्धांमध्ये तो खेळताना दिसू शकतो. .Asia Cup 2025: गौतम गंभीर आल्यापासून हे असंच होतंय... Arshdeep Singh वर होणाऱ्या अन्याविरोधात R Ashwin ने उठवला आवाज .विशेष म्हणजे या दोन्ही स्पर्धा साधारण एकाचवेळी सुरू होणार असूनही तो या दोन्ही स्पर्धांमध्ये खेळताना दिसल्याची दाट शक्यता आहे. ILT20 ही स्पर्धा २ डिसेंबर २०२५ पासून सुरू होणार आहे. तसेच ४ जानेवारी २०२६ ला संपमार आहे. तसेच बीबीएल १४ डिसेंबर २०२५ ला सुरू होणार असून २५ जानेवारीला संपणार आहे.अश्विनने ILT20 स्पर्धेच्या लिलावासाठी त्याचे नावही नोंदवले आहे. हा लिलाव १ ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. या लिलावात अश्विनला बोली लागण्याची दाट शक्यता आहे. तथापि, त्याची सध्या बीबीएलमधील चार वेगवेगळ्या संघांशी चर्चाही सुरू आहे. त्याची सिडनी थंडर्स, होबार्ट हरिकेन, सिडनी सिक्सर्स आणि ऍडलेड स्ट्रायकर्स या संघांसोबत चर्चा सुरू आहे. .यातही रिकी पाँटिंग प्रशिक्षक असलेला सिडनी थंडर्स आणि डेव्हिड वॉर्नर कर्णधार असलेला होबार्ट हरिकेन हे संघ त्याला संघात घेण्यासाठी सर्वाधिक उत्सुक आहेत, असे वृत्त इएपीएन क्रिकइन्फोने दिले आहे. यातील एका संघाशी या आठवड्यात करार पूर्ण होण्याची शक्यता आहे.अश्विन बीबीएल २०२५-२६ मध्ये संघाच्या शेवटच्या तीन किंवा चार सामन्यांसाठी आणि संघ जर अंतिम सामन्यात पोहचला, तर अंतिम सामन्यासाठी उपलब्ध असू शकतो. या करारामध्ये २०२६ - २७ हंगामासाठीही एक तरतुद असेल..म्हणजेच आगामी काळात आधी अश्विन ILT20 खेळताना दिसेल आणि मग बीबीएलमध्ये खेळताना दिसू शकतो. त्यामुळे तो या दोन्ही स्पर्धांमध्ये खेळणारा पहिला भारतीय खेळाडू ठरू शकतो. याशिवाय तो बीबीएलमध्ये खेळणापा भारताचा पहिला पुरुष कॅप खेळाडू (आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला) ठरू शकतो. यापूर्वी उन्मुक्त चंद बीबीएलमध्ये खेळला आहे, पण तो भारताच्या वरिष्ठ संघाकडून कधी खेळलेला नाही. पण आता हे करार होण्याची दाट शक्यता असली, तरी ते अधिकृतरित्य समोर येण्याची वाट पाहावी लागणार आहे..इतिहास घडतोय... निवृत्तीनंतर R Ashwin चं आणखी एक 'Bold' पाऊल, असा निर्णय घेणारा ठरणार पहिलाच भारतीय.तथापि, ILT20 आणि बीबीएल, या दोन्ही स्पर्धा खेळणारा अश्विन जगातील पहिला खेळाडू नाही, जगभरातील अनेक खेळाडू या दोन्ही स्पर्धांमध्ये खेळतात. हे खेळाडू देखील दोन्ही स्पर्धांचे करार करताना कालावधीचाही विचार करतात. बीबीएलमध्ये प्रत्येक संघाला प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन परदेशी खेळाडू खेळवण्याची परवानगी आहे. बीबीएल २०२५-२६ साठी आधीच सर्व फ्रँचायझींनी तीन-तीन खेळाडू प्री-सिजन ड्राफ्ट्समधून निवडले आहेत. पण अजून त्यांना ४ खेळाडू खेळण्याची मुफा आहे..FAQs१. आर अश्विनने भारतीय क्रिकेटमधून कधी निवृत्ती घेतली?(When did R Ashwin retire from Indian cricket?)➤ आर अश्विनने ऑगस्ट २०२५ मध्ये सर्व प्रकारच्या भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.२. आर अश्विन कोणत्या स्पर्धांमध्ये खेळण्याची शक्यता आहे?(Which tournaments is R Ashwin likely to play in?)➤ तो ILT20 (UAE) आणि BBL (ऑस्ट्रेलिया) या स्पर्धांमध्ये खेळण्याची शक्यता आहे.३. ILT20 स्पर्धा कधी होणार आहे?(When will ILT20 2025 take place?)➤ ILT20 २ डिसेंबर २०२५ ते ४ जानेवारी २०२६ दरम्यान खेळवली जाणार आहे.४. BBL २०२५-२६ कधी होणार आहे?(When will BBL 2025-26 take place?)➤ BBL १४ डिसेंबर २०२५ ते २५ जानेवारी २०२६ दरम्यान होणार आहे.५. अश्विनशी कोणत्या BBL संघांची चर्चा सुरू आहे?(Which BBL teams are in talks with Ashwin?)➤ सिडनी थंडर्स, होबार्ट हरिकेन, सिडनी सिक्सर्स आणि ऍडलेड स्ट्रायकर्स या संघांची त्याच्याशी चर्चा सुरू आह६. अश्विन BBL मध्ये कोणता इतिहास रचू शकतो?(What history could Ashwin create in BBL?)➤ तो BBL मध्ये खेळणारा पहिला भारतीय कॅप पुरुष खेळाडू ठरू शकतो..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.