R Ashwin sparks debate by suggesting India A or South Africa should play in Asia Cup
esakal
आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघासमोर आज यूएईचे आव्हान
अफगाणिस्तानने पहिल्या लढतीत हाँगकाँगवर मिळवला दणदणीत विजय
आशिया चषक स्पर्धेच्या दर्जावर प्रश्नचिन्ह
R Ashwin suggests India A or South Africa inclusion in Asia Cup : आशिया चषक २०२५ स्पर्धेला कालपासून सुरूवात झाली आणि अफगाणिस्तानने दुबळ्या हाँगकाँगचा धुव्वा उडवला. आज भारतीय संघासमोर यजमान संयुक्त अरब अमिराती संघाचे आव्हान आहे. यासाठी चाहते उत्सुक आहेत, परंतु भारताचा माजी फिरकीपटू आर अश्विनने या स्पर्धेच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. यूट्यूब चॅनेलवर बोलताना अश्विनने आशिया चषक स्पर्धेबद्दल मोठं विधान केलं आहे. आशिया चषक स्पर्धेकडे तुम्ही ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेची तयारी म्हणून पाहूच नका, असेही तो म्हणाला.