R Ashwin raises his voice in support of Arshdeep Singh
esakal
आशिया चषकात अर्शदीप सिंगला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान न मिळाल्याने चर्चा रंगली.
आर. अश्विनने सांगितले की अर्शदीपला वगळणे ही गौतम गंभीर युगापासून सुरू असलेली बाब आहे.
यूएईसारख्या संघाविरुद्ध अतिरिक्त फलंदाजाचा विचार करणे अनावश्यक असल्याचे त्याने म्हटले.
Ashwin Raises Voice for Arshdeep Ahead of IND vs PAK Clash : भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेत विजयी सुरूवात केली असली तरी अर्शदीप सिंगचं प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणं, हा चर्चेचा विषय ठरला आहे. भारताकडून ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला असे बाकावर बसवल्याने सर्वांना आश्चर्य वाटले. यूएईविरुद्धच्या सामन्यात जसप्रीत बुमराह हा एकमेव जलदगती गोलंदाज होता आणि त्याच्यासोबतीला शिवम दुबे व हार्दिक पांड्या होते. त्याशिवाय अक्षर पटेल हा फिरकीपटूचा पर्याय होता.