
R Ashwin Retirement: भारताचा दिग्गज क्रिकेटपटू आर अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ब्रिस्बेनमधील तिसरा कसोटी सामना अनिर्णित राहिल्यानंतर अश्विनने कर्णधार रोहित शर्मासोबत पत्रकार परिषदेसाठी उपस्थित राहून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला.
अश्विन भारताच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठे विक्रम केले आहेत. त्यामुळे त्याची निवृत्ती भारतीय चाहत्यांना चटका लावणारी ठरली आहे. अश्विनने अचानक निवृत्ती जाहीर केल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.