चेतेश्वर पुजाराने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
आर. अश्विनच्या मते पुजाराचे योगदान विराट कोहली आणि रोहित शर्माएवढेच मौल्यवान आहे.
तिसऱ्या क्रमांकावर पुजाराच्या धीरगंभीर फलंदाजीमुळे विराट कोहलीला मोकळेपणाने खेळता आले.
R Ashwin credited Cheteshwar Pujara for Virat Kohli’s success : भारताच्या कसोटी क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेल्या चेतेश्वर पुजाराने रविवारी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. विराट कोहलीसोबत बराच काळ कसोटी क्रिकेट खेळणारा पुजारा आता टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूमचा सदस्य नसणार आहे. विराटने कसोटीत ९२३० धावा केल्या आहेत, तर पुजाराच्या नावावर ७१९५ धावा आहेत. भारताच्या माजी कर्णधाराने पुजारापेक्षा २००० धावा जास्त केल्या असल्या तरी भारताचा महान फिरकीपटू आर अश्विनने मोठा दावा केला आहे.