What happened at Wankhede Stadium 2012 Shah Rukh Khan incident?
esakal
What happened at Wankhede Stadium 2012 Shah Rukh Khan incident? कोलकाता नाइट रायडर्स जेव्हा जेव्हा वानखेडे स्टेडियमवर खेळायला आले, तेव्हा बॉलिवूड सुपर स्टार शाहरुख खान याची आठवण काढली गेलीय.. २०१२ मध्ये वानखेडे स्टेडियमवर शाहरुख खानसोबत झालेला बहुचर्चित वाद हा इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासातील सर्वात वादग्रस्त घटनांपैकी एक मानला जातो. या घटनेनंतर शाहरुख खानवर वानखेडे स्टेडियमवर पाच वर्षांची बंदी घातली गेली आणि तेव्हापासून ते आजपर्यंत तो या मैदानावर फिरकलाही नाही. त्यावेळी नेमकं काय घडलं असेल, याबाबत अनेक चर्चा रंगल्या. पण, आज तेव्हाचे सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) इक्बाल शेख यांनी हा वाद गैरसमजातून घडल्याचे म्हटले.