
भारतीय क्रिकेट संघाने रविवारी (९ मार्च) चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा जिंकली. भारताने रविवारी दुबईला झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडला ४ विकेट्सने पराभूत केले.
भारताने हा विजय मिळवत २५ वर्षांपूर्वीच्या पराभवाचं दु:ख दूर केलं. २५ वर्षांपूर्वी २००० साली झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताला न्यूझीलंडने पराभूत केले होते. दरम्यान, भारताने तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे.