

Rahul Dravid on Vaibhav Sooryavanshi
esakal
Rahul Dravid on Vaibhav Suryavanshi: माजी भारतीय क्रिकेटपटू राहुल द्रविडने वैभव सूर्यवंशीच्या क्रिकेट कारकिर्दीबाबत महत्त्वाचं मत व्यक्त केलं आहे. वैभवसारखा प्रतिभावान खेळाडू देशांतर्गत क्रिकेटमध्ये व्हाईट-बॉलसोबतच रेड बॉल क्रिकेटही खेळत आहे, ही चांगली गोष्ट असल्याचं द्रविडने म्हटलं आहे मात्र, वैभवची कारकीर्द यशस्वी व्हावी यासाठी त्याला योग्य समतोल आणि पुरेसा वेळ देणं गरजेचं असल्याचंही त्याने सांगितलं.
आयपीएलमधील दमदार हंगामानंतर वैभवला जूनमध्ये इंग्लंडविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली. आता १५ वर्षीय वैभवची दुलीप ट्रॉफीमध्ये पूर्व विभागाकडून खेळताना रेड-बॉल क्रिकेटमध्ये परीक्षा होणार आहे.