

Rahul Dravid
Sakal
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (BCCI) १५ मार्च रोजी वार्षिक पुरस्कार सोहळा दिल्ली येथे पार पडणार आहे. या २०२५-२६ वर्षाचा पुरस्कार (Awards) सोहळा असेल. या सोहळ्यात भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज आणि प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) आकर्षण ठरेल.
त्याच्या कारकिर्दीचा या सोहळ्यात गौरव करण्यात येणार आहे. त्याला जीवनगौरव पुरस्काराने (Lifetime Achievement Award) सन्मानित करण्यात येईल. याशिवाय शुभमन गिललाही (Shubman Gill) मोठा पुरस्कार मिळणार आहे.