

Rahul Dravid & Anil Kumble
Sakal
Rahul Dravid & Anil Kumble Gets Stand Named After them at Chinnaswamy Stadium: भारतीय क्रिकेटच्या आजपर्यंतच्या इतिहासात अनेक खेळाडूंनी मोलाचा वाटा उचलला आहे. यामध्ये माजी कर्णधार राहिलेल्या राहुल द्रविड, अनिल कुंबळे आणि शांता रंगस्वामी यांचाही मोठा राहिला आहे. राहुल द्रविडचे नाव आज भारताच्या महान फलंदाजांमध्ये घेतले जाते, तर अनिल कुंबळेने भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत.
शांता रंगस्वामी (Shantha Rangaswamy) भारताच्या महिला संघाचे नेतृत्व सांभाळले आहे. विशेष म्हणजे कुंबळे आणि द्रविड (Anil Kumble & Rahul Dravid) दोघांनीही भारताचे प्रशिक्षकपदही सांभाळले आहे.
आता या कर्नाटकच्या तिन्ही खेळाडूंना मोठा सन्मान करण्यात येणार आहे. या तिघांचे नाव बंगळुरूमधील एम चिन्नास्वामी स्टेडियमवरील (M Chinnaswamy Stadium) स्टँड्सला देण्यात येणार आहे.