Rahul Dravid to become CSK head coach IPL 2027?
esakal
Kasi Viswanathan statement on CSK coach Stephen Fleming: चेन्नई सुपर किंग्सला इंडियन प्रीमिअर लीगच्या मागील काही पर्वांत साजेशी कामगिरी करता आलेली नाही. संघातील मोठं नाव, महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) हा दुखापतीमुळे पूर्ण हंगाम खेळू शकला नाही. तो पुढील वर्षी तरी खेळेल का, हेही अद्याप सांगता येत नाही. त्यात मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांच्या हकालपट्टीची चर्चा रंगली आहे आणि त्यांच्या जागी टीम इंडियाचा माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ( Rahul Dravid) याचे नाव पुढे येत आहे. या सर्व घडामोडींवर CSK चे सीईओ कासी विश्वनाथन यांनी मोठे अपडेट्स दिले आहेत