Anvay Dravid 211 strike rate India U19
India U19 vs Australia U19 first unofficial ODI : अन्वय द्रविड आणि आर्यवीर सेहवाग यांनी त्यांचे वडील राहुल द्रविड व वीरेंद्र सेहवाग यांच्या पावलावर पाऊल टाकत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. १९ वर्षांखालील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वन डे सामन्यात दोघंही चमकले आणि भारताला विजय मिळवून दिला. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या लढतीत यष्टिरक्षक-फलंदाज अन्वय सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि त्याने १८ चेंडूंत ३८ धावांची खेळी केली. त्याने २११.११ च्या स्ट्राईक रेटने फटकेबाजी करताना २ चौकार व ३ षटकार खेचले.