
संजू सॅमसनने राजस्थान रॉयल्सकडे स्वतःला रिलीज करण्याची अधिकृत विनंती केली आहे.
CSK फ्रँचायझी संजूसाठी उत्सुक असून त्यांनी त्याला ताफ्यात घेण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
राजस्थान रॉयल्सने संजूच्या बदल्यात CSK कडून दोन खेळाडूंची मागणी केली आहे.
Sanju Samson might be headed to CSK in IPL 2026 : संजू सॅमसनने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ पूर्वी राजस्थान रॉयल्सकडे त्याला रिलीज करण्याची मागणी केली आहे. आयपीएल २०२६ साठी मिनी ऑक्शन अपेक्षित आहे आणि त्यापूर्वी ट्रेडिंग विंडोतून इकडचे खेळाडू तिकडे आणि तिकडचे इकडे, असे पाहायला मिळणार आहे. सध्याच्या घडीला संजू सॅमसन याची जोरदार चर्चा आहे आणि त्याला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी चेन्नई सुपर किंग्स ( CSK ) फ्रँचायझीने जोर लावला आहे. राजस्थान रॉयल्स त्यांच्या कर्णधाराला रिलीज करण्याच्या मानसिकतेत नाही, परंतु संजूलाच थांबायचे नाही. त्यामुळे आता RR ने चेन्नई फ्रँचायझीकडे संजूच्या बदल्यात दोन खेळाडूंची मागणी केली आहे.