
RCB New Captain Rajat Patidar : आयपीएल २०२५ हंगामाचे विजेतेपद रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूने जिंकले. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूने कर्णधापरदी फलंदाज रजत पाटीदारची फेब्रुवारीमध्ये निवड झाली होती. आता ३ जून रोजी रजत बंगळुरूचा आयपीएल विजेता कर्णधार ठरला.
३१ वर्षीय पाटीदार देशांतर्गत क्रिकेटमध्ये मध्य प्रदेश संघाचे नेतृत्व करतो. २०२२ च्या आयपीएल लिलावात अनसोल्ड राहिलेला पाटीदार आरसीबीचा कर्णधार कसा झाला तुम्हाला माहित आहे का? त्याने आरसीबीकडून खेळण्यासाठी आपलं लग्नही पुढे ढकललं होतं आणि कदाचित याचमुळे तो आज कर्णधारपदापर्यंत मजल मारू शकला. त्याच्या करिअरला कलाटणी देणारा हा किस्सा जाणून घ्या.