छत्तीसगडच्या किराणा दुकान मालकाला चुकून रजत पाटीदारचा जुना मोबाईल नंबर मिळाला.
त्या नंबरवर विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स यांचे कॉल येऊ लागले.
रजत पाटीदारने स्वतः कॉल करून नंबर परत मागितला, पण दुकान मालकाने ते प्रँक समजले
हॅलो, मी विराट कोहली बोलतोय... तुमच्या मोबाईलवर असा एखादा कॉल आला तर तुम्हालाही तो फेक असल्याचा किंवा स्कॅम असल्याचे वाटेल. त्यात दक्षिण आफ्रिकेचा महान फलंदाज एबी डिव्हिलियर्सचाही फोन आल्यास नक्कीच काहीतरी गडबड हे समजून जाल. पण, छत्तीसगडच्या एका किराणा मालाच्या दुकान मालकाला खरंच विराट व एबी डिव्हिलियर्सचे कॉल आले. हे सर्व एका चुकीमुळे घडलं...