BCCI shake-up IPL 2025 top-level reshuffle : इंडियन प्रीमिअर लीग २०२५ ची फायनल ३ जूनला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पंजाब किंग्स-रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघांमध्ये होणार आहे. आयपीएलच्या फायनलची तयारी जोरात सुरू असताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळात ( BCCI) बदलाचे वारे वाहण्याचे संकेत मिळत आहेत. कसोटीतून नुकताच निवृत्त घेतलेला विराट कोहली याच्या जवळच्या व्यक्तीची बीसीसीआयमध्ये एन्ट्री होण्याचे वृत्त समोर आले आहे.