
रणजी ट्रॉफी २०२४-२५ स्पर्धा अखेरच्या टप्प्यात आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना २६ फेब्रुवारीपासून खेळवला जाणार आहे. अंतिम सामना ५ दिवसांचा असून विदर्भ विरुद् केरळ संघात हा सामना होणार आहे.
हा अंतिम सामना जिंकून तिसऱ्यांदा रणजी ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी विदर्भ उत्सुक आहे, तर केरळ संघ पहिल्या विजेतेपदासाठी लढणार आहे.